नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात होत आहे. तर देशाचा अर्थसंकल्प उद्या (१ फेब्रुवारी) सादर होणार आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. दहा दिवसांचे हे अधिवेशन पुढील महिन्याच्या ९ तारखेपर्यंत चालणार आहे. एकूण आठ बैठका प्रस्तावित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू President Draupadi Murmu दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत आहेत. येत्या १ फेब्रुवारीला सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ‘अमृतकालाच्या सुरुवातीला ही इमारत बांधण्यात आली आहे, त्यात एक भारत, श्रेष्ठ भारताचा सुगंधही आहे. मला विश्वास आहे की या नवीन इमारतीत धोरणांवर अर्थपूर्ण संवाद होईल.”
निवडणुकीनंतर नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सरकारकडे कोणताही कायदेविषयक अजेंडा नाही आणि राष्ट्रपतींचे अभिभाषण, धन्यवाद प्रस्तावावरील चर्चा, अंतरिम अर्थसंकल्प सादर करणे आणि जम्मू-काश्मीरसाठी अर्थसंकल्प सादर करण्यावर सरकारचा भर असेल.
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधे ‘त्या’ 8 जागांसाठी अंतर्गत खलबती, कोणाला मिळणार संधी ?