नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 चा अर्थसंकल्प Budget 2024 सादर करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने हा पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा पहिलाच अंतरिम अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असल्याने सर्वसामान्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात, असे मानले जात आहे.
- अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारत सुविधा
- गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी मोदी सरकार करणार लसीकरण. या आजारापासून बचाव करण्यासाठी मुलींना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
- आरोग्य क्षेत्रात देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुविधा वाढणार
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना सुविधा देण्यात येणार
- तिहेरी तलाक प्रथा बंद
- महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार
- पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरं महिलांना
वंदे भारत : 40 हजार डब्यांचे अपग्रेड होणार
- अर्थमंत्र्यांनी सांगितले की, लोकांना चांगल्या रेल्वे सुविधा पुरविण्यावर सरकारचा भर आहे. यामुळे वंदे भारतकडे सरकारचे खूप लक्ष असून त्यानुसार रेल्वेच्या ४० हजार डब्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.
- मोदी सरकारने मध्यमवर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. सरकार लवकरच एक गृहनिर्माण योजना आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे सर्वांना परवडणारी घरे मिळतील.
विमानतळांची संख्या दुपटीने वाढवणार
- देशातील विमानतळांची संख्या दुपटीने वाढून १४९ झाली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशात 1000 पेक्षा जास्त नवीन विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे.
- मोदी सरकारच्या काळात उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, महिला उद्योजकतेत २८ टक्के वाढ झाली आहे.
एक कोटी कुटुंबांना मिळणार 300 युनिट मोफत वीज
- रूफटॉप सोलरायझेशनच्या माध्यमातून दरमहा एक कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज देण्यात आली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11.8 कोटी शेतकऱ्यांना फायदा
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ 11.8 कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे.पीक विमा योजनेचा लाभ 4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला आहे.