पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. पिंपरी चिंचवडच्या तळवडे एमआयडीसीत एक फटाक्याचं गोदाम आहे. या गोदामाला भीषण आग Massive Fire लागल्याची घटना घडली आहे. दुर्दैवी म्हणजे ही आग एवढी झपाट्याने पसरली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या आगीची भीषणता होती की यामध्ये आत्तापर्यंत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.
सविस्तर माहितीनुसार, पिंपरी चिंचवडच्या तळवडे एमआयडीसीत हे फटाक्याचे गोदाम आहे. वाढदिवसासाठी केकवर ज्या मेणबत्ती (स्पार्कल) लावल्या जातात त्या विशेष मेणबत्ती बनवण्याचा हा कारखाना होता. या कारखान्यामध्ये नेमकी कशाने आग लागली हे समजू शकले नाही. परंतु ही आग गंभीर स्वरूपाची होती. या आगीमध्ये सहा महिलांचा अद्याप होरपळून मृत्यू झाला आहे. या मृतांची नावे समजू शकली नसून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर घटनास्थळी सात ते आठ रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. या कारखान्यांमध्ये अजूनही कामगार काम करत होते. आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतर कामगारांचा शोध घेण्याचं काम सुरू आह.