मुंबई : मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब पेरला असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रूमला आला आहे. दरम्यान बुधवारी रात्री पुणे पोलिसांना असाच धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना बॉम्ब पेरल्या बाबतचा मेसेज आला आहे. या मेसेजनंतर आता मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे.
या मेसेजमध्ये मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब पेरले असल्याचं म्हटलं आहे. हे हा मेसेज नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठवला, तसेच मेसेजचे गांभीर्य पाहता पोलिसी यंत्रणा अलर्ट मोडवर असून संदेश पाठवणार याचा कसून शोध घेतला जातोय.










