छत्रपती संभाजीनगर : शहरातील फाजलपुरा येथे राजकीय वादातून जफर मर्चन्ट यांच्या लेडीज वेअर दुकानावर अज्ञातांकडून दगडफेक आणि हल्ला करण्यात आल्याची घटना 29 एप्रिल रोजी रात्री घडली. दरम्यान दुकानात महिला कामगार काम करीत असताना हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती, माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नेमकं काय घडाल ?
29 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. जफर मर्चन्ट हे महाविकास आघाडीचे काम करतात याच रागातून काही लोक रात्री तोंडाला रुमाल बांधून आले होते. यानंतर त्यांनी जफर यांच्या मर्चन्ट ट्रेन्झ या लेडीज वेअर दुकानावर दगडफेक केली. दुकानात महिला कामगार असल्याने त्या घाबरल्या. हल्ला केल्यानंतर काही वेळातच हल्लेखोर पसार झाले. माहिती मिळताच सिटीचौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एसीपी संपत शिंदे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली. सध्या परिथिती नियंत्रणात आहे.
माळशिरस : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठोकला महाराष्ट्रात तळ; “त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे ! ” पंतप्रधानांची शरद पवारांचे नाव न घेता खोचक शब्दात टीका