लोणावळा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी शासनाला दिलेला 20 जानेवारीचा अल्टिमेटम संपला आणि त्यांनी आंदोलनाची तलवार उपसून हर हर महादेव म्हणून मुंबईकडे कूच केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी मधून ही पदयात्रा सुरू झाली असून पुणे पार करून सध्या सर्व आंदोलक लोणावळ्यामध्ये आहेत. पुढच्या काही तासातच हे भगव वादळ मुंबईमध्ये दाखल होईल. सरकारकडून हे आंदोलक मुंबई पर्यंत पोहोचू नये आणि मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
जालन्यातील अंतरवाली सराटी मधून 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारोने मराठा आंदोलन निघाले होते. या पदयात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाव आणि शहरामधून यामध्ये मराठा आंदोलन सामील होत आहेत. मुंबईपर्यंत ही संख्या लाखोंच्या घरात होणार आहे. एकंदरीत हे भगव वादळ मुंबईत येऊन धडकलं तर परिस्थिती बिकट होऊ शकते. भावी परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने देखील या प्रकरणावर कायमचा तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मराठा आंदोक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे लोणावळ्यामध्ये पोहोचले आहेत. जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल असा विश्वास अर्दड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
या चर्चेनंतर नेमकं काय होतं ? आणि तोडगा निघतो का ? हे आता काही वेळातच समजेल. परंतु दोन वेळा आमरण उपोषण आणि आता हे भगव वादळ घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील हे किरकोळ आश्वासनाने ऐकतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. याचा अंदाज राज्य सरकारला देखील आहे. त्यामुळे या चर्चेनंतर नेमकं काय होते हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
https://www.facebook.com/share/v/u1HtVyp6FjLGdapA/?mibextid=qi2Omg