मुंबई : मराठा आरक्षणास अद्याप बरीच मोठी लढाई लढाईची आहे. असंच काहीस चित्र आता दिसून येते आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही लढाई थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10% टक्के आरक्षण दिला आहे. तर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या 10% आरक्षणाच्या विरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे.
https://www.facebook.com/share/v/NFTsLgx81wK5Ewxi/?mibextid=qi2Omg
गेल्या आठवड्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनेक थेट वक्तव्य आणि सरकारला इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी उपोषण जरी सोडल असलं तरी साखळी उपोषण अद्याप देखील सुरूच आहे. राज्य सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच मान्य केलं. तर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही अशा मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नोकरी आणि शिक्षणात देण्यात आले. परंतु हे आरक्षण मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. सरसकट ओबीसीतून आरक्षण दिलं जावं आणि सगे सोयरे बाबत अंतिम निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी ठाम भूमिका अद्यापही मनोज जरांगे पाटील यांची आहे.
https://www.facebook.com/share/v/2KDko9rbTp3vkTma/?mibextid=qi2Omg
आतापर्यंत हा वाद राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सुरू होता. आता यामध्ये गुणरत्न सदावर्ते हे देखील हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून सामील झालेत. दरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षण प्रकरणी सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडून आव्हान दिले. त्याचबरोबर 27 फेब्रुवारी रोस्टर पद्धतीने केलेल्या बदलाबाबतही हे आव्हान देण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण हाय कोर्टामध्ये काय निर्णय घेऊन बाहेर पडते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.