मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दाखल याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कठोर शब्दात फटकारले होते. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी अखेर अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या कामकाजाचा वेळापत्रक जाहीर केल आहे.
ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या माहितीची पुष्टी केली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायधीकरणाने सुनावणीच्या कामकाजाचा वेळापत्रक जाहीर केलं आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10161024767310185&id=585360184&mibextid=Nif5oz
6 ऑक्टोबर 2023 रोजी याचिका करते मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे 23 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर एकनाथ शिंदे गटाचे वकील यांचे म्हणणे दाखल करतील.
13 ऑक्टोबर रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या पिटीशन ची सुनावणी एकत्र व्हावी या मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे मागणी करण्यात आलेल्या अर्जावर युक्तिवाद होईल
13 ऑक्टोबर 23 ऑक्टोबर दरम्यान अपात्रतेबाबत सुनावणी विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या कागदपत्रांची आदेशांची पाहणी करण्यासाठी कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्हीही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येणार आहे
20 ऑक्टोबर रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या पिटीशन ची सुनावणी एकत्र व्हावी अतिरिक्त युक्तिवाद आणि कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याची मागणी करणाऱ्या मूळ शिवसेना उद्धव ठाकरे कथा तर्फे दाखल अर्जांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय आदेश जाहीर करतील
27 ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या कागदपत्रांपैकी जे कागदपत्र ऍडमिट करायचे आणि कोणते नाकारायचे यावर दोन्हीही पक्षांनी आपले म्हणणे सादर करायचे आहेत.
सहा नोव्हेंबर रोजी अपात्रतेबाबत निर्णय घेताना काय मुद्दे विचारात घेतले पाहिजेत यावर दोन्हीही पक्षांनी आपले लेखी म्हणणे सादर करायचे आहेत.
दहा नोव्हेंबर रोजी अपात्रतेबाबत निर्णय घेताना काय मुद्दे विचारात घेऊन नक्की केले पाहिजे त्यावर विधानसभा अध्यक्ष दोन्हीही बाजूंचे युक्तिवाद ऐकणार आहेत.
20 नोव्हेंबर रोजी प्राथमिक तपासणी घेण्यासाठी दोन्हीही पक्षांनी त्यांच्या साक्षीदारांची यादी आणि प्रतिज्ञापत्र दाखल करायचे आहेत.
23 नोव्हेंबर रोजी उलट तपासणी सुरू होईल आणि आवश्यकतेनुसार दोन्हीही पक्षांच्या वकिलांच्या व सोयीनुसार तारखा देण्यात येतील शक्य असेल त्याप्रमाणे उलट तपासणी आठवड्यातून दोनदा घेण्यात येईल.
सगळ्यांचे म्हणणे आणि पुरावे ऐकून घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाणार आहे.