बारामती : भारतात एकीकडे प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष सुरू दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र राजकीय उलथापालथ सुरु आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी देखील वाढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी चौकशीचं समन्स बजावलं आहे.
कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने रोहित पवार यांनी येत्या बुधवारी म्हणजेच 24 जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं समन्समध्ये लिहिले आहे. ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं आहे.