सावंतवाडी : सिंधुदुर्गमधील सावंतवाडी Sawantwadi तालुक्यातील सांगेला या गावातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. सांगली गावातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या 43 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा Food Poisoningझाली आहे. सुदैवाने या सर्व विद्यार्थ्यांना वेळेत चांगले उपचार मिळाले असल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं समाजात आहे.
नेमकं काय घडलं
सावंतवाडी तालुक्यातील सांगेला गावातील जवाहर नवोदय विद्यालयात मेस मध्ये रात्रीच जेवण या विद्यार्थ्यांनी घेतलं होतं. गुरुवारी रात्रीच्या जेवणानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागलं. 43 विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या विद्यार्थ्यांना वेळेत योग्य उपचार देण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य केंद्राने दिल आहे.
शाळेने काय दिलं स्पष्टीकरण
खरंतर शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये कसूर होणे हा देखील एक मोठा गुन्हा म्हणावा लागेल. परंतु प्राथमिक चौकशीतून जेवणात वापरण्यात आलेले बटाटे हे खराब असल्या कारणामुळे ही विषबाधा झाली असावी असा अंदाज शाळेतील शिक्षकांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता यावर पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
International Women’s Day : ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार स्त्री पुरुष समानत्यासाठी अजून 131 वर्षे लागणार ? म्हणून महिला दिन साजरा करावाच लागेल ! वाचा हि माहिती