मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी Bhushan Gagrani यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव Saurabh Rao यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हे मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं नुकतेच महाराष्ट्र सरकारला काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये प्रामुख्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची बदली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आता मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे देण्यात आल आहे. त्यासह नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इक्बाल चहल यांच्या बदलीवरून मोठ्या प्रमाणावर राजकारण झाले. त्यांची बदली करण्यात यावी म्हणून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी देखील थेट निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार निवडणूक आयोगानं त्यांना पदावरून हटवलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने इकबाल चहल, अश्विनी भिडे आणि पि वेलारुसू यांची बदली करण्यात येऊ नये असे विनंती पत्र पाठवले होते. परंतु निवडणूक आयोगानं महाराष्ट्र सरकारची ही विनंती फेटाळून मोठ्या प्रशासकीय बदल्या केल्या आहेत.