मुंबई : आज देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी MTHL शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलाच उद्घाटन करणार आहेत. आज सकाळी पंतप्रधा नरेंद्र मोदी हे हवाई दलाच्या खास विमानाने नाशिकमध्ये पोहोचले. तिथे काळाराम मंदिरात दर्शन आणि गोदावरीची जलपूजा केल्यानंतर नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. यानंतर आता मुंबईतील अटल सेतूचे पंतप्रधानांच्या हस्ते थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे.
कसा आहे शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल
- दक्षिण मुंबईतील शिवडी येथून चालू होणारा हा ब्रिज रायगड तालुक्यातील उरण येथील न्हावा शेवा गावात संपणार आहे.
- एकूण 21.8 किलोमीटर लांबीचा हा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक आहे.
- या ब्रिजचा 16.50 किमीचा मार्ग समुद्रात आणि 5.5 किमीचा मार्ग जमिनीवर आहे.
- अटल सेतू हा 6 पदरी सागरी ब्रिज आहे.
- तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ब्रिजच आज उद्धाटन होत आहे.
- उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल.
- या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासाच अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार आहे.

अटल सेतूवरुन या वाहनांना परवानगी नसणार !
▪️ दुचाकी, मोपेड, तीन चाकी वाहन, ऑटो, ट्रॅक्टर, बैलगाडी आणि धीम्या गतीने धावणाऱ्या वाहनांना या ब्रिजवर प्रवेश नसणार आहे.
अशाप्रकारे होणार हायटेक ORT टोल कलेक्शन ?

- शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलावर टोलिंगची अत्याधुनिक पद्धत असणार आहे.
- या ब्रिजवर ORT म्हणजे ओपन रोड टोलिंग असणार आहे.
- अटल सेतूवर अत्याधुनिक स्कॅनर्स आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ते या मार्गावरुन वेगात पळणाऱ्या वाहनांना हेरुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल कलेक्शन करतील.