नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांना 21 मार्चला अटक केली होती. दरम्यान आज राऊज अवेन्यू कोर्टाने त्यांना पुन्हा कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांची आज कोठडी संपली होती. परंतु केजरीवाल हे सहकार्य करत नसल्याचा आरोप कोर्टामध्ये ईडीने केला. त्यामुळे कोर्टाने त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Lok Sabha Election 2024 : माढ्यात लोकसभा उमेदवारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग; मविआकडून प्रवीण गायकवाड इच्छुक, दिल्लीत शरद पवारांची घेतली भेट
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता तिहार तुरुंगात हलवण्यात येणार आहे. 28 मार्चला ईडीन गोव्यातील आपच्या नेत्यांशी उलट तपासणी करायची असल्याचे सांगितलं होतं. दरम्यान आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह हे तुरुंग क्रमांक दोन मध्ये शिक्षा भोगत होते. त्यांना आता तुरुंग क्रमांक 5 मध्ये हलवण्यात आल आहे. मनीष सिसोदिया यांना तुरुंग क्रमांक 1 मध्ये आहेत. तर सत्येंद्र जैन हे तुरुंग क्रमांक 7 मध्ये आहेत. दरम्यान चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीन कोर्टामध्ये केला, त्यानुसार आता केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून त्यांना आता तिहार तुरुंगात हलवलं जाणार आहे.