नागपूर : कुख्यात गुंड अरुण गवळी Arun Gawli यास मुदतीपूर्वी सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. नागपूर तुरुंगात अरुण गवळी शिक्षा भोगत आहे. सध्या त्याचे वय वर्षे आहे.
नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणी आणि इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अरुण गवळी यास दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2007 सालापासून तो तुरुंगात आहे. आता सोळा वर्ष अरुण गवळी याने शिक्षा भोगली आहे. 2006 च्या शासन निर्णयानुसार, अरुण गवळी हा सध्या 69 वर्षाचा आहे. तसेच आतापर्यंत त्याने निम्मी शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सुटका होऊ शकते.
या दोन नियमांमुळे कुख्यात गुंड अरुण गवळी हा आता त्याची कैद पूर्ण न भोगताच बाहेर येणार आहे. नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता. दरम्यान आता मुदतपूर्व सुटका करणे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यावर आता उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे जेल प्रशासन आता यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.