मुंबई : लोकसभा निवडणुकीचा आज पाचवा टप्पा महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये पार पडतो आहे. विशेष म्हणजे मुंबईतील सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून पवईमध्ये EVM बंद पडल्याचे घटना घडली आहे.
दरम्यान मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर सेलिब्रिटी, नेते मंडळी देखील हजेरी लावत आहेत. अशातच निवेदक आणि अभिनेता आदेश बांदेकर Aadesh Bandekar यांना मतदानासाठी आल्यानंतर दोन-तीन तास वाट पाहावी लागली. यामुळे त्यांनी संतापून एक व्हिडिओ शूट करून तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/C7LhW3sMV6I/?utm_source=ig_web_copy_link
आपल्या instagram लाईव्ह मध्ये आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, “मी आता पवईतील एका मतदान केंद्रावर आहे. हिरानंदानीसारखा सुशिक्षित परिसर आहे. इकडच्या 57, 58 या दोन्ही पोलिंग बूथवरील याद्या बंद झाल्या आहेत. सगळ्या मशिनरी बंद आहेत. तीन-तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर काहीजण घरी जात आहेत. दोन तासांपासून आम्ही उन्हात प्रतीक्षा करतोय. कोणी उत्तरच देत नाहीयेत. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलमधील मतदान केंद्रावर ही परिस्थिती आहे. वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत.” अशा भाषेत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.