Tesla : एलॉन मस्क नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. कधी नव्या टेक्नॉलॅजी आणतो, कधी नवी कॉन्ट्रोवर्सी तर कधी सोशल मीडियावरील बदल. एलॉन मस्कने काही दिवसांपुर्वीच ट्विटरच्या नावात बदल केला. यापुर्वी मस्कने ‘AI Technology’, ‘खेड्यात हायस्पीड इंटरनेट’, ‘मानवाच्या मेंदूत चिप बसवणार’ अशा घोषणा केल्या. आता, टेस्ला भारतात येणार का? यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता मस्कने सांगितलं की, ‘टेस्ला’ या कार कंपनीचं भारतातील पाहिलं कार्यालय पुण्यात सुरु करणार आहे.
५ लाख इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या प्रस्तावावर चर्चा
टेस्ला ही अमेरिकेतील प्रसिद्द इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. टेस्ला कंपनीचं भारतात लॉंचींग करण्यासाठी कपंनीचे सर्वोच्च अधिकाऱ्यांची आणि केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांची चर्चा सुरु आहे. त्यानुसार आता टेस्लाने पुण्यातील विमान नगर परिसरातील जागा कार्यालयासाठी भाडेतत्वावर घेतली आहे. आता टेस्लाचे भारतातील पहिले कार्यालय हे पुण्यात उभारण्यात येणार आहे. आता टेस्ला भारतात दरवर्षी ५ लाख इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर देखील चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय. त्याबरोबरच इतर अनेक गोष्टींसाठी मस्कचं आणि भारत सरकारचं बोलणं सुरू आहे. परंतु, त्याला अजून अंतिम स्वरुप मिळालं नाही.
पुण्यातील विमाननगर परिसरात त्यांच पहिलं वहिलं कार्यालय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच हे चांगले परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रधानमंत्री मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते, तेव्हा टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी मोदींची भेट घेतली. त्याचवेळी या कराराबद्दल बोलणी सुरू होती. टेस्ला लवकरच भारतात प्रकल्प उभारणीला सुरुवात करेल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता टेस्ला पुण्यातील विमाननगर परिसरात त्यांच पहिलं वहिलं कार्यालय सुरू करणार आहे.
पंचशील बिझनेस पार्कमध्ये घेतली जागा
टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी कंपनीने (Tesla India Motor & Energy) त्यांच्या पहिल्या शाखेसाठी भारतातील पुण्याच्या विमाननगरमध्ये पंचशील बिझनेस पार्कमधील एका टॉवरमध्ये जागा घेतली आहे. या टॉवरच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सहकारी केंद्रात ५ हजार ८५० चौरस फूट जागा टेस्लाने आपल्या पहिल्या कार्यालयासाठी भाडेतत्वावर घेतली आहे. ही जागा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. या भाडेतत्त्वात १ ऑक्टोबरपासून तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधी आहे. यासोबतच या प्रकल्पासाठी एकूण पाच वर्षांची मुदत असणार आहे. यात कंपनीची इच्छा असल्यास ती आणखी पाच वर्षांसाठी कालावधी वाढवू शकते. या अतिरिक्त पाच वर्षांच्या कालावधीच्या पर्यायासोबत कंपनीला एकूण १० वर्षांपर्यंतची मुदत मिळू शकते.
मस्क (Tesla) देणार ११.६५ लाख रुपयांचे मासिक भाडे
कंपनी ११.६५ लाख रुपयांचे सुरुवातीचे मासिक भाडे भरणार असून हे प्रत्येक वर्षाला ५ टक्क्यांनी वाढणार आहे. संपूर्ण लीज कालावधीत एकूण भाडे ७.७२ कोटी रुपये होणार आहे. तसेच ३४.९५ लाख रुपये डिपॉझिट ठेवणार आहे. CRE Matrix द्वारे जाहीर झालेल्या कागदपत्रानुसार हा करार २६ जुलैला टेबलस्पेस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडसोबत (Tablespace Technology Private Limited) करण्यात आला आहे.
तुम्ही हे देखील वाचू शकता,









