श्रीहरिकोटा : सर्व आव्हानांवर मात करत गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण सुरू करण्यात आले आहे. इस्रोने २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून त्याचे प्रक्षेपण केले आहे. गगनयान मोहिमेचे हे पहिले चाचणी उड्डाण होते. या यशस्वी चाचणीनंतर भारत स्वत: क्रू स्पेसक्राफ्ट प्रक्षेपित करू शकणाऱ्या देशांच्या यादीत सामील होणार आहे.
याला टेस्ट व्हेइकल एबॉर्ट मिशन-१ आणि टेस्ट व्हेइकल डेव्हलपमेंट फ्लाइट (टीव्ही-डी१) असेही म्हणतात.
क्रू एस्केपच्या क्षमतेची चाचणी
यानाच्या क्रू एस्केप सिस्टीमची क्षमता तपासण्यासाठी ही फ्लाइट अॅबॉर्ट टेस्ट घेण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत क्रूला बाहेर पडण्याची आवश्यकता असेल तेव्हा याचा वापर केला जातो. गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट तीन दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या 400 किमीच्या कमी कक्षेत मानवाला अंतराळात पाठविणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे आहे.
एस. सोमनाथ यांनी केले अभिनंदन
“टीव्ही-डीव्ही 1 (क्रू मॉड्यूल) मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. या यशाबद्दल त्यांनी इस्रोच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
बंगालच्या उपसागरात प्रक्षेपित होणार
चाचणी यानात अंतराळवीरासाठी तयार केलेले क्रू मॉड्यूल सोबत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे रॉकेट क्रू मॉड्यूलच्या साडेसोळा किलोमीटर वर जाईल आणि त्यानंतर ते बंगालच्या उपसागरात उतरेल.