Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलैला दुपारी 2:35 वाजता होणार आहे. इस्रोची (ISRO) ही तिसरी चंद्र मोहीम आहे आणि यासाठी LVM-3 रॉकेटचा वापर केला जाणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून हे प्रक्षेपण होणारे. भारताची ही तिसरी चंद्र मोहीम आहे. दुसऱ्यांदा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी चांद्रयान-३ मध्ये ऑर्बिटर नाही. त्याऐवजी ते एक प्रोपल्शन मॉड्यूल आहे. जे कम्युनिकेशन सॅटेलाइटप्रमाणे काम करेल.
हे मिशन 615 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार
याआधी केवळ तीन देश अशाप्रकारची मोहीम यशस्वीपणे करू शकले आहेत. चांद्रयान-2 च्या अपयशानंतर, संपूर्ण देश चांद्रयान-3 च्या यशाची अपेक्षा करत आहे. चांद्रयान-३ च्या सुरुवातीच्या बजेटसाठी इस्रोला ६०० कोटी रुपयांची अपेक्षा होती. मात्र हे मिशन 615 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणारे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चंद्रावर उतरण्याचा आणखी एक प्रयत्न करणारे. यावेळी प्रक्षेपण अधिक इंधन, एकाधिक फेल-सेफ आणि मोठ्या लँडिंग साइटसह लोड केले जाईल. सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे सप्टेंबर 2019 मध्ये चांद्रयान-2 ची मोहीम अपयशी ठरली होती.
अतिरिक्त सौर पॅनेल आहेत
इस्रो प्रमुख म्हणाले की विक्रम लँडरमध्ये आता इतर पृष्ठभागांवर अतिरिक्त सौर पॅनेल आहेत जेणेकरून ते कसेही उतरले तरीही ते उर्जा निर्माण करत राहील.लँडिंग साइट 500 मीटर x 500 मीटरवरून 2.5 किलोमीटर केली आहे. ते कुठेही उतरू शकते, त्यामुळे ते तुम्हाला एका विशिष्ट बिंदूला लक्ष्य करण्यासाठी मर्यादित करत नाही. हे केवळ नाममात्र परिस्थितीत विशिष्ट बिंदू लक्ष्य करेल. त्यामुळे ते त्या प्रदेशात कुठेही उतरू शकते.
चांद्रयान-2 च्या अपयशाची कारणं (Reasons for failure of Chandrayaan-2)
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चांद्रयान-2 च्या अपयशावर बोलताना सांगितलं की, इंजिनांनी अपेक्षेपेक्षा जास्त जोर निर्माण केला होता. विक्रम लँडरची वळण्याची क्षमता सॉफ्टवेअरद्वारे मर्यादित होती. विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग न होण्याचे तिसरे कारण म्हणजे अंतराळ यानाच्या लँडिंगसाठी ओळखण्यात आलेली 500 मीटर x 500 मीटर लँडिंग साइट आहे. विमानाचा वेग वाढवून तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला जात होता. ते जवळजवळ जमिनीच्या जवळ आले होते आणि वेग वाढतच होता.