World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 302 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कपमधील सलग सातवा विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र श्रीलंकला ऑलआऊट 55 रन्सचं करता आल्या. टीम इंडिया या विजयासह आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे.
बांगालदेशनंतर श्रीलंका संघाचेही विश्वचषकातील कारकीर्द संपुष्टात आली आहे. वानखेडेच्या मैदानावर भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला. सात सामन्यात श्रीलंकेचा हा पाचवा पराभव होता. महत्वाच्या खेळाडूंना दुखापत अन् संघात असणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे श्रीलंकेला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागते आहे.
श्रीलंकेला सात सामन्यात पाच पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेला फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. महत्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीचा श्रीलंकेला फटका बसला. श्रीलंकेला नेदरलँड्स आणि इंग्लंडविरोधात फक्त विजय मिळवता आला. पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.