अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 च्या विश्वचषकाचा World Cup 2023 अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने आपली ९ वि विकेट देखील गमावली आहे. सूर्यकुमार ची विकेट गेल्याने भारताच्या संकटात भर पडली आहे.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आयसीसी विश्वचषक 2023 (फायनल) मध्ये भारत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावले आहेत.
हे वाचलेत का ? World Cup 2023 : विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, वनडे विश्वचषकात गाठला मोठा टप्पा
वर्ल्ड कपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांच्या (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह स्कोअर) आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी आहे. विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया 13 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 8 वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने 5 सामने जिंकले आहेत.
डावाच्या ४५व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या रूपाने भारताने आठवी विकेट गमावली. बुमराह एलबीडब्ल्यू आऊट झाला. यावेळी बुमराह 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 45 षटकांनंतर भारताची धावसंख्या 8 बाद 215 अशी झाली.
मोहम्मद शमीच्या रुपात भारताने आपली सातवी विकेट गमावली आहे. मिचेल स्टार्कने शमीला ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 44 षटकानंतर भारताची धावसंख्या 7 गडी गमावून 213 झाली आहे.
केएल राहुलच्या रुपात भारतीय संघाने आपली सहावी विकेट गमावली. केएल राहुल ६६ धावा करून बाद झाला. केएल राहुलला जोशच्या हातून मिचेल स्टार्कने कॅच आउट केले. 42 षटकांनंतर भारताची धावसंख्या 6 बाद 207 अशी झाली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्लेइंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश एंगलिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेजलवूड.