विशाखापट्टणम : वर्ल्ड कपमधील निराशाजनक पराभवानंतर आजपासून T20 सीरीज T20 series सुरु होत आहे. सूर्यकुमार यादव हा बुधवारी पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला सामोरा गेला. सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेसाठी आला, तेव्हा समोर फक्त 2 पत्रकार होते. नियमित कॅप्टन हार्दिक पांड्या आणि अन्य सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे टीमच नेतृत्व दिलय.
नियमाप्रमाणे कुठल्याही सीरीजच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद होते. कॅप्टन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देतो. सूर्यकुमार यादव बुधवारी पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला सामोरा गेला.त्याने सुद्धा अशी कल्पना केली नसेल. सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेसाठी आला, तेव्हा समोर फक्त 2 पत्रकार होते. विशाखापट्टनमध्ये भारत-ऑस्ट्रेलियामध्ये पहिला T20 सामना होणार आहे.
क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी X वरुन या पत्रकार परिषदेबाबत पोस्ट केली आहे. “वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी 200 पत्रकार होते, तेच आता फक्त 2 पत्रकार आले. कॅप्टन म्हणून सूर्यकुमारने पहिल्या पत्रकार परिषदेत अशी कल्पना केली नसेल. भारतातील पत्रकार परिषदेला सर्वात कमी उपस्थितीचा हा रेकॉर्ड आहे का? मला असं वाटत” असं विमल कुमार म्हणाले.
वर्ल्ड कप बद्दल सूर्यकुमार यादव व्यक्त झाला. “तुम्ही निराश होण स्वाभाविक आहे. शेवटी, तुम्ही मागे वळून प्रवासाकडे पाहता, तेव्हा वर्ल्ड कप उत्तम अभियान ठरल्याच दिसेल. फक्त सदस्यांनाच नाही, संपूर्ण भारताला आम्ही मैदानावरील जी कामगिरी दाखवली, त्याचा अभिमान आहे. हे सकारात्मक आहे. आम्हाला सुद्धा याचा अभिमान आहे” असं सूर्यकुमार यादव म्हणाला. “फायनलमधील पराभव विसरायला वेळ लागेल. तुम्ही उद्या सकाळी उठलात, विसरुन जाल अस नाहीय. ही मोठी टुर्नामेंट होती. आम्हाला जिंकायला आवडलं असतं. पण तुम्हाला हे विसरुन पुढे जाव लागेल” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.