मुंबई : मुंबईतील वानखेडे मैदानावर आज भारत न्यूझीलंड वर्ल्ड कप सेमी फायनल सामना सुरू आहे. हा सामना पाहण्यासाठी अर्धे बॉलीवूड आज वानखेडे मैदानावर पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळालं. भारताने आत्तापर्यंत जबरदस्त कामगिरी करून न्यूझीलंड समोर 398 चे टारगेट ठेवले आहे. दुसरी इनिंग सुरू झाली असून आत्तापर्यंत न्युझीलँडचे 39 झाले असून दोन खेळाडू बाद झाले आहेत.
हे वाचलेत का ? ICC World Cup 2023 : धुराळाचं ! भारताची आक्रमक खेळी ; न्यूझीलंड समोर 398 चे टार्गेट
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासह रणबिर कपूर, जॉन अब्राहम, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, सुपरस्टार रजनीकांत, शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत, मधुर दीक्षित हे कलाकार मैदानावर उपस्थित होते. त्यासह नीता अंबानी या देखील टीम इंडियाला शेअर करण्यासाठी मैदानावर उपस्थित आहेत. यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली लेक सारासह उपस्थित आहे. तर लोकप्रिय फुटबॉलपटू डेविड बॅकहेम देखील हा सामना पाहण्यासाठी उत्साहात असल्याचं पाहायला मिळत आहे.
एवढेच नाही तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर उपस्थित आहेत. भारताने आत्तापर्यंत जबरदस्त कामगिरी करून न्यूझीलंड समोर 398 चे टारगेट ठेवले आहे. दुसरी इनिंग सुरू झाली असून आत्तापर्यंत न्युझीलँड से 39 झाले असून २ खेळाडू बाद झाले आहेत. वानखेडे मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला आहे.
विराटाचे शतक पूर्ण झाल्यानंतर श्रेयस अय्यरचे देखील शतक पूर्ण झालं आहे. विराट आणि श्रेयसच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय अत्यंत उत्साहात आहेतच. त्यासह भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा देखील आपल्या खेळाडूंवर प्रचंड खुश असल्याचे दिसून आले आहे.