India vs Australia Final : अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम Narendra Modi Stadium विश्वचषक २०२३ 2023 World Cup च्या अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. क्रिकेट महाकुंभाच्या विजेतेपदाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया India vs Australia Final यांच्यात १९ नोव्हेंबर ला होणार आहे. स्टेडियमबाहेर आणि अहमदाबाद शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी गुजरात प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सामन्याच्या दिवसासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन आयसीयू रुग्णालये उभारण्यात आली आहेत. त्यासाठी ६० वैद्यकीय कर्मचारी सज्ज राहणार आहेत.
हे वाचलेत का ? TCS च्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिस; 15 दिवसात रुजू व्हा अन्यथा… कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
2023 World Cup अहमदाबादचे मोटेरा स्टेडियम विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी सज्ज
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी गुजरात प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सामन्याच्या दिवसासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन आयसीयू रुग्णालये उभारण्यात आली आहेत. त्यासाठी ६० वैद्यकीय कर्मचारी सज्ज राहणार आहेत.
पंतप्रधानांपासून व्हीव्हीआयपी सामना पाहण्यासाठी येणार
अंतिम सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सर्वसामान्यांबरोबरच व्हीव्हीआयपीही जमताना दिसणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह उद्योगपती, चित्रपट सृष्टीतील मान्यवर, माजी क्रिकेटपटू आणि इतर राजकारणी येऊ शकतात. सर्वांची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिस यंत्रणेकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
या भागात पोलीस गस्त घालणार
शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात गस्त घालण्यात येत आहे. तसेच क्रिकेटपटू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेडियममध्ये सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी विशेष आढावा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने यंत्रणेकडून कडक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि व्हीव्हीआयपींच्या आरोग्याचा विचार करून स्टेडियममध्ये व्हीव्हीआयपींसाठी दोन आयसीयू रुग्णालये उभारण्यात आली आहेत.
हे वाचलेत का ? Cyber Security : तुम्हीही Chrome वापरता का? पर्सनल डेटापासून सिस्टीम सिक्युरिटीपर्यंत सर्व काही धोक्यात; युजर्सना इशारा !
रुग्णवाहिका सज्ज राहतील
प्रेक्षकांसाठी ६ खाटांचे रुग्णालयही बांधण्यात आले आहे. खेळाडूंसाठी एक, व्हीव्हीआयपींसाठी एक आणि इतर प्रेक्षकांसाठी चार अशा सहा रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. स्टेडियमच्या प्रत्येक गेटवर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये सहा वैद्यकीय मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.