आयसीसी विश्वचषक २०२३ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. रोहितचा पलटन हा एकमेव संघ आहे जो या स्पर्धेत अपराजित राहिला आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व ९ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताची इनिग्स पूर्ण झाली असून भारताने तब्बल ३९८ चे टार्गेट न्यूझीलंड च्या संघासमोर ठेवले आहे.
हे वाचलेत का ? India vs New Zealand : विराट पाठोपाठ श्रेयस अय्यरचे देखील शतक पूर्ण; भारताची ऐतिहासिक खेळी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. न्यूझीलंडनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
हे वाचलेत का ? Virat Kohli’s world record : “शतकाचे अर्धशतक पूर्ण” ; वानखेडेवर क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला
भारत विरुद्ध न्यूझीलंड प्लेइंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डार्ल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त खेळी केली आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी करत टीम इंडियाचा स्कोअर 350 च्या पार नेला आहे. श्रेयस अय्यरने 67 चेंडूत 100 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅकवर आला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा मधल्या फळीचा कणा मजबूत झाला आहे. भारताची इनिग्स पूर्ण झाली असून भारताने तब्बल ३९८ चे टार्गेट न्यूझीलंडच्या संघासमोर ठेवले आहे.