विश्वचषक २०२३ : आयसीसी विश्वचषक २०२३ च्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे.भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व ९ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने सलग चार सामने गमावल्यानंतर श्रीलंकेला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीतील किवी संघाचा विक्रम भारताविरुद्ध उत्कृष्ट राहिला आहे. गेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. 2019 मधील कटू आठवणी आजही ताज्या आहेत. आजच्या सामन्याकडे 140 कोटी देशवासियांना आशा आहेत. भारताचे पाच खेळाडू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरतील. या खेळाडूंकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत.
भारतीय संघ आपल्या प्लेइंग ११ मध्ये फारशी छेडछाड करणार नाही. हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते. सलग सहाव्या सामन्यात भारतीय संघ समान प्लेइंग ११ सह मैदानात उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.