पंढरपूर : आज कार्तिकी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनाला पंढरीनगरीत Pandharpur भाविकांनी गर्दी केली आहे. पंढरपुरात भक्तीचा सागर लोटला आहे. चंद्रभागेच्या किनारीही भक्तांनी गर्दी केली आहे. चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरीच्या दर्शन करत वारकरी कृतकृत्य होतात असे मानले जातात.
कार्तिकी एकादशी निमित्ताने संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांशी सजावट करण्यात आली आहे.
यावर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला.