सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतून सर्वच प्रमुख नेते, पदाधिकारी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर झंजावाती दौरे करत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे वाईमध्ये उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना उदयनराजे यांना मोठं मताधिक्य मिळायला हवं असं आवाहन केलं आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज वाईमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी आमदार मकरंद पाटील, देवयानी फरांदे, धैर्यशील कदम, नितीन पाटील, सुनील काटकर त्याचबरोबर आरपीआयचे अशोक गायकवाड, संजय गायकवाड, नितीन भरगुडे पाटील आदी उपस्थित होते.
शिंदे-फडणवीस भूसंपादन घोटाळा प्रकरण : 2 दिवसात नाशिकमधील घोटाळ्याचे पुरावे सादर करून स्फोट करणार; संजय राऊतांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, ” साताऱ्याच्या विकासाचं माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या. बाकीचा काही विचार करू नका. मी राज्य मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन. काहीही झाले तरी उदयनराजेना मोठं मताधिक्य मिळायला हवं. ” असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.