नवी दिल्ली. : नव्या लोकसभेमध्ये कामकाजाला सुरुवात झाली आहे या लोकसभेमध्ये पहिलं विधेयक हे महिला आरक्षणाचा मांडण्यात आला असून सुरुवातच श्रेय वादाच्या लढाईने झाली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या लोकसभेत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं म्हटलं जाते आहे.
नव्या लोकसभेमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक मांडल्यानंतर हे विधेयक आम्हीच आणला आहे जे आत्ता मोदी सरकार करत आहेत असा दावा काँग्रेसने केला आहे दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात आज या महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि श्रेय वादावर चर्चा होणार आहे
केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली असून मंगळवारी केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नव्या लोकसभेत विधेयक सादर केले हा कायदा तयार झाल्यानंतर लोकसभेत महिलांची संख्या 181 होणार असल्याचं मेघवाल यांनी म्हटला आहे दरम्यान या विधेयकाला नारीशक्ती वंदन अधिनियम असे नाव देण्यात आले आहे
मंगळवारी सोनिया गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की हे विधेयक आमचे आहे काँग्रेसचे राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोदी सरकारने आमचं विधेयक आणला आहे असं म्हटलं आहे तर काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी देखील मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.