मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते एकीकडे सभा घेऊन आपल्या उमेदवाराचा जंगी प्रचार करत आहेत तर विरोधक त्या सभेतील वक्तव्य आणि त्या नेत्यावर कडाडून टीका करत आहेत. जोपर्यंत या निवडणुका संपत नाही तोपर्यंत हे चित्र संपूर्ण देशाला पहावच लागणार आहे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ” राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही. मग आता जर उमेदवार त्यांचा नाही तर शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार आहे? आम्ही ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्याच दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवतीर्थ आम्हाला सभेसाठी मिळावे यासाठी अर्ज केला आहे. सगळं काही रेकॉर्डवर आहे. आम्ही रस्त्यावर सभा घेणार नाहीत. आम्हाला आमची स्वतःची पोरं आहेत. 22 पोरांसाठी आम्ही शिवतीर्थावर सभा घेत आहे. जर शिवतीर्थावर सभा घेता आली नाही तर इतर आम्ही बीकेसी आणि इतर जागांचा विचार करु. ” असं अनिल परब म्हणाले आहेत.
येत्या 17 तारखेला मनसेने शिवतीर्थावर सभेसाठी अर्ज केलाय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत. आणि आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण ताकद लावली जाते आहे. भाजप की बार चारसो पार असा नारा दिलाय यावर देखील अनिल परब यांनी भाष्य केले. नाशिकच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले की, ” हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली. या विषयी बोलताना अनिल परब म्हणाले, हेमंत गोडसे यांना येथे नाशिकमध्ये कुठेही फायदा होणार नाही. सगळ्यांनी तिथे आपली जागा आहे असा आग्रह केला होता त्याचा फटका गोडसे यांना बसेल. प्रत्येकाला आपला उमेदवार नाशिकमध्ये द्यायचा होता. असा अनिल परब म्हणाले.