मुंबई : सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते मुद्दे घेतले जातात याहीपेक्षा आज महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे तो म्हणजे जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेलं वक्तव्य तसेच नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवादाचा हा व्हिडिओ
नेमका संवाद काय
तर झालं असं की, ” आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समोरासमोर आले. या भेटीदरम्यान नाना पटोले यांनी हे काय चाललंय ? असा सहज सवाल एकनाथ शिंदेंना केला. शिंदेंना पटोलेंचा प्रश्नाचा रोख लक्षात आला आणि त्यांनी ” मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच…!” असं वक्तव्य केलं. यावर नाना पटोले यांनी पुन्हा प्रतिप्रश्न केला. ” मला सांगा तुम्ही, त्याला वाढवलं ना ? यावर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ” तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होतं.” यानंतर या दोघांचा संवाद तिथेच संपला. या संवादाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि मुख्यमंत्री नेमकं कोणाबद्दल बोलताय अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान एकंदरीत राजकीय वातावरण पाहता हा रोख मनोज जरांगे पाटील यांच्या दिशेने असल्याचं देखील बोलले जात आहे.
नाना पटोले : हे काय चाललंय ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ” मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच…!”
नाना पटोले : ” मला सांगा तुम्ही, त्याला वाढवलं ना ?”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ” तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होतं.”
सध्या एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडचा रस्ता सोडला आहे. सध्या ते अंतरवली सराटीमध्ये आहेत. त्यांनी आपलं आमरण उपोषण देखील थांबवल आहे. यापुढे आंदोलनाची दिशा कशी असेल हे ते लवकरच सांगतील. असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे त्यांच्या एकंदरीत वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांचा थेट निषेध केला होता. सरकारच्या संयमाची परीक्षा पाहू नये जरांगे यांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू नये असे देखील थेट सरकारनं जरांगे यांना सुनावल आहे.