कलकत्ता : आत्ताच एक मोठी बातमी समोर येते आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी West Bengal Chief Minister Mamata Banerjee यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वर्धमान या ठिकाणी एक बैठक होणार होती. या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी या एका कार्यक्रमासाठी जाणार होत्या. तिथून हेलिकॉप्टरने कलकत्त्याला परत येणार होत्या. परंतु खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने न येता त्यांच्या वाहनाने कलकत्त्याला परत येत असताना हा अपघात झाला आहे. कारचालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून एसएसकेएम या रुग्णालयामध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.