मुंबई : बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित आहे. असं असतानाच या आगीमध्ये तेल घेऊन स्वतः देखील उडी मारायला विजय शिवतारे तयार आहेत. अजित पवारांच्या विरोधात त्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. प्रसार माध्यमांसमोर बोलताना शिवतारे यांनी अजित पवारांबाबत अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. दरम्यान आता शिवतारे यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
दरम्यान विजय शिवतारे यांनी मुंबईमध्ये तडका फडकी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे ठरवलं होतं. बराच तास वाट पाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री यांची भेट मिळाली यावेळी, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तसेच सगळ्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं म्हणणं मांडलं . असं शिवतारे यांनी सांगितलं.
या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी एक पाऊल मागं घेतल आहे. नेमकी या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकल नाही. पण त्यानंतर विजय शिवतारे म्हणाले की, ” मी गेल्या चार दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. बारामती मधून उमेदवारी मागे घ्यायला अजून लोकसभेचे फॉर्म भरलेले नाहीत किंवा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत नजीक येऊन ठेपलेली नाही. त्यामुळे मी बारामती मतदारसंघातून उमेदवारी मागे घेणार की नाही हे ठरवण्यासाठी बराच अवधी आहे. एकनाथ शिंदे यांना इतर लोकांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ हवा असेल, त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा काय बोलतात हे पहावं लागेल. तेव्हा निवडक पदाधिकाऱ्यांसोबत मी पुन्हा बैठकीला येईल. ” असं विजय शिवतारे म्हणाले होते,. त्यामुळे आता या पुढच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.