पुणे : वसंत मोरे Vasant More यांना यंदाची लोकसभा निवडणूक लढवायचीच आहे हे त्यांच्या मनातलं आता संपूर्ण महाराष्ट्राला पक्क माहिती आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून संधी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न केले. मरंतु महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी जाहीर केली. तर सध्या ते प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत.
मनसे सोबत अठरा वर्ष निष्ठेने काम केल्यानंतर त्यांनी अंतर्गत वादंगामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ही लोकसभा निवडणूक लढवायचीच हे त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर पुण्यात येऊन रवींद्र धंगेकर यांची देखील भेट घेतली. पण महाविकास आघाडीच्या वतीने रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा प्रकाश आंबेडकरांच्या दिशेने वळवला आहे. कालच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना उमेदवारीबाबत मागणी केल्याचं म्हटलं जातंय. तर आज त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची थेट अंतरवली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली आहे.
येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा देखील आपल्याला पाठिंबा मिळावा या प्रमुख कारणासाठी त्यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. एकंदरीतच अद्याप वसंत मोरे हे कोणाकडून निवडणूक लढवणार हे निश्चित झालं नसलं तरीही त्यांची जबरदस्त मोर्चे बांधणी मात्र सुरू असल्याचं दिसून येते.