पुणे : लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Elections तारीख पुढच्या काही वेळातच आता जाहीर होणार आहे. आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारणात तुफान हालचाली आणि फेरफार झाले आहेत. यामध्ये गाजलेलं एक नाव आहे ते म्हणजे पुण्यातील लोकप्रिय तात्या म्हणजेच वसंत मोरे Vasant More यांची….
गेल्या अनेक महिन्यांपासून मनसेमध्ये नाराज असलेले वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आधी शरद पवार आणि त्यानंतर संजय राऊत यांची भेट घेतली आहे. आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट सांगून महाविकास आघाडीच्या नेत्यांची ते सध्या भेट घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज कात्रजमध्ये बॅनरबाजी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

या बॅनरवर लिहिल आहे की, ‘ कात्रज हा मनसेचाच बालेकिल्ला राहणार आहे…!’ मनसेचे नेते गणेशांना नाईकवाडे यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे आज वसंत मोरे यांच्या विरोधात सर्वत्र पुण्यामध्ये लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.