अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते जोमानं प्रचार करत आहेत. अशातच एक बातमी समोर येते आहे. ती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर Sujat Ambedkar यांच्याबाबत… सुजात यांना उन्हाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीची वाढती रणधुमाळी आणि दुसरीकडे उन्हाचा वाढता कहर यामुळे सुजात आंबेडकर यांना त्रास झाला. सध्या ते अकोल्यामध्ये प्रचार करत आहेत. अकोल्याच तापमान आज 43 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळेच सुजात यांना त्रास जाणवू लागला म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
सध्या सुजात आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहात खंड पडू नये म्हणून आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ” काळजी करण्याचं कारण नाही. मी आंबेडकर जयंती पासून पुन्हा प्रचारात सहभागी होणार. प्रचारात खंड पडू देऊ नका. ” असा संदेश त्यांनी सहकाऱ्यांना दिला आहे.