मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. फेसबुक लाईक दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या मॉरिस याने केली आहे असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मॉरिस यानी स्वतः आत्महत्या देखील केली. परंतु या फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या या मॉरिसनेस झाले आहे हे मात्र दिसत नाही. अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी श्वान जरी गाडीखाली आला तरी हे राजीनामा मागतील अशी टीका केली. होती यावर आता उद्धव ठाकरे यांनी जहरी शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर कठोर शब्दात टीका करताना म्हटले आहे की, फडणवीस हे जे बोलले त्यांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणून ते सुसंस्कृत होत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना मी फडतूस, कलंक बोललो. पण आता काही शब्द नाहीत. मनोरुगण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत. सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वतः दिल्लीत जाऊन दिल्लीश्वरांसमोर शेपटी हलवता अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करा – उद्धव ठाकरे
तसेच ” सरकार हे पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहण्याऐवजी गुंडांच्या मागे उभ राहत असेल तर कठीण आहे. राज्यात गुंडगिरी वाढणार. पूर्वी एक जाहिरात होती. मेलेडी खाओ खुद जान जाओ ! आता तशी परिस्थिती आहे. ती भाजप मे आओ सब भूल जाओ, ही मोदी गॅरंटी आहे ? सरकार गुंडांच्या मागे उभे राहिल तर अशीच गुंडगिरी राहील या पुढच्या पिढ्या आपलं भवितव्य गुंडांच्या हाती देणार आहात का ? असा सवाल जनतेला विचारायचा आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणारच नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगतो की हे सरकार बरखास्त करा. राष्ट्रपती राजवट लागू करा. अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.