छत्रपती संभाजीनगर : सोमवारी सकाळीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्व आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक टीका होताना दिसून येत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील कठोर शब्दात अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
” मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, एक-दोन दिवसात राजकीय दिशा ठरवेन..!” अशोक चव्हाण यांनी स्पष्टचं सांगून टाकलं
आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले का ?
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ” शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात दिली आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातात देणार की काय ? अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय ? असे म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
Ashok Chavan Resigns : ” काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिल आहे…!” अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी व्यक्त केली खंत
भाजपवर सडकून टीका
तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, ” भाजप भाडोत्री लोक घेत असून सतरंज्या उचलणाऱ्यांच्या बोकांडी बसवत आहेत. आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफोडी करत आहेत. आणखीन काही वर्षानंतर भाजपचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस मधून आलेला असेल. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी आव्हान केले असून पोलिसांना बाजूला ठेवा लोकांना गोळा करू आणि विचारू शिवसेना कोणाची आहे. मला अशोक चव्हाण यांच आश्चर्य वाटतं. आजपर्यंत सगळ्या जागा वाटपात वाटून घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते . आणि आता गेले अशी देखील टीका त्यांनी केली आहे.
SANJAY RAUT : ” अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का ?” चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची खरमरीत टीका