मुंबई : अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला शिवसेना पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्रता प्रश्न 10 जानेवारी 2024 ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल घोषित केला. यांनी निकालामध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचं देखील घोषित केलं.
विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांनी घोषित केलेल्या या निकालानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली असून आज पत्रकार परिषद देखील घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडणार आहेत.
https://fb.watch/pC7lTHUdfr/?mibextid=RUbZ1f
उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर लगेचच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. आता या दोन्हीही पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय आरोप प्रत्यारोप होतात हे लवकरच समजेल.