पुणे : लोकसभा निवडणुकीची तारीख आता केव्हाही जाहीर होऊ शकते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय खलबती सुरू आहेत. तर आता पुणे जिल्ह्यातून देखील एक मोठी बातमी समोर येते आहे.
अर्थात स्वतः अजित पवार यांनी अद्याप या विषयावर कोणतही भाष्य केलेलं नाही. परंतु नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला प्रचंड उधाण आला आहे.
” आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा…!” संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला ? वाचा सविस्तर
नेमकं प्रकरण काय
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाऊ शकतं. मग शिरूर मतदार संघामध्ये तोडीस तोड म्हणून जुने जाणते नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळणं आवश्यक आहे. परंतु सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा खासदार असल्याकारणाने ही जागा राष्ट्रवादीसाठीच दिली जावी असा आग्रह आहे. सध्या शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेना शिंदे गटात आहेत. त्यामुळे आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.