मुंबई : कायदा आणि नियम हे सर्वांना एक सारखेच आहे. याची प्रचिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दत्तात्रेय भरणे, दिलीप वळसे पाटील आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना आला आहे. वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तब्बल 27 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
” त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला देखील माहित आहे ! “, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 27 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना 14,200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नसून दिलीप वळसे पाटील यांना 5200 रुपयांचा दंड तर दत्तात्रय भरणे यांना सहाशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.