मराठी आरक्षणासाठी आंदोलन करणारे व तो लढा कायम ठेवणारे मनोज जरांगे पाटलांना फ्कत महाराष्ट्रच नव्हे तर आता देश ही ओळखतो. बहुप्रतिक्षित असलेल्या या मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा महाराष्ट्राची जनता लावून बसली आहे. सध्या ते देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. या आंदोलनात अनेक हात त्यात पाठिंवा देत आहेत तर काही त्यांचे समर्थन देखील करत आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील एका हॉटेल (Hotel) चालकाने देखील मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी एक भन्नाट ऑफर सुरु केली आहे. त्यामुळे या ऑफरची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण या हॉटेलमध्ये मनोज नाव असलेल्या व्यक्तीला थेट मोफत जेवण देण्यात येत आहे. मात्र, यासाठी अट देखील ठेवण्यात आली आहे.
बाळासाहेब भोजने यांनी आपल्या हॉटेलच्या बाहेर एक बोर्ड लावला आहे, ज्यात म्हटले आहे की,“ ज्या पध्दतीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभारून अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्रीत केले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय किंवा इतर ताकदीचे पाठबळ नसतांनाही जर आपले ध्येय निश्चित असेल व समाजासाठी चांगले कार्यकरण्याची निर्मळ निस्वार्थ भावना मनात असेल तर एकटा माणूस काय करू शकतो हे मनोज जरांगे पाटीलासारख्या लढावय्या योध्याने दाखवुन दिले. त्यांच्या कार्याला मनापासुन सलाम.
आपल्याकडूनही मनोज जरांगे यांना त्यांना समर्थन मिळावं असा विचार मनात घेऊन मनोज नावाच्या नागरिकांना मोफत जेवन दिलं जात आहे. बाळासाहेब भोजने असं हॉटेल मालकाचं नाव असून त्यांनी जरांगे यांचे नाव ‘मनोज’ असल्याने त्यांच्या नावकऱ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असताना मनोज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे, अशी अट ठेवली आहे.