बीड : नाशिकमध्ये उमेदवारीवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावरच अखेर शिक्कामोर्तब होणार अशी परिस्थिती असताना, अजय बोरस्ते, राहुल ढिकले यांची नाव देखील शर्यतीत पुढे येऊ लागली आहेत. अशातच बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने महायुतीत एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, ” प्रीतम मुंडे यांना मी नाशिक मधून उभ करेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीत आणि राजकीय वर्तुळात चर्चेला प्रचंड उधाण आले होते. आधीच नाशिकमध्ये महायुतीला उमेदवारीचा तिढा सोडवता येत नाहीये. त्यात पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्याने असे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आज पंकजा मुंडे यांनी आपले शब्द मागे घेतले आहेत.
भर जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिकची उमेदवारी देणार असं म्हटलं होतं. यावर त्या आज म्हणाल्या आहेत की, प्रीतम मुंढे यांना नाशिक मधून उभ करणार हे मी सहज बोलून गेले. काही नासमझ लोकांनी याचा वेगळा अर्थ काढला. नाशिक हे प्रीतम मुंडे यांचे सासर आहे. त्यांना सासरला पाठवता येईल अशा आशयाने बोलले. मात्र काही लोकांचे स्वागताचे मेसेज देखील आले. ” असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाले आहेत.