नागपूर : सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असतानाची चित्र दिसून येत आहेत. शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली होती. परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे Anna Hazare यांच्याकडून पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात क्लोजर रिपोर्टला आव्हान दिले आहे. दरम्यान यावर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
यावेळी भाजपवर गंभीर आरोप करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले की, ” हे सगळं षडयंत्र भाजप तर्फे सुरू आहे. दुभती गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंत तिला चारा खाऊ घालायचा. पण जेव्हा ही गाय दूध द्यायचं बंद करेल तेव्हा तिला कसायाकडे पाठवायची तयारी सुरू होते. हे भाजपचं धोरण आहे. अजित पवार यांच्याबाबतही असंच काहीसं असावं असं धक्कादायक वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं.
माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, विरोधातील नेत्याला आपल्याकडे घ्यायचं त्यानंतर त्याच्यासाठी पुन्हा चौकशीचा ससे मिरा लावायचा. त्याला बदनाम करायचं. एकेका नेत्याला राजकारणातून कायमचा उठवण्याचा हा भाजपचा प्रयत्न दिसतो. दूध देने वाली गाय जब तक दूध देती है तब तक चारा खिलाते हे, गाय दूध देणा बंद करती है तो उसको कसाई के पास भेजने की तयारी सुरू होती. है असं भाजपचे धोरण असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आणि ह्या षडयंत्र मध्ये अजित पवार अडकल्याचा दावा देखील अनिल देशमुख यांनी केला आहे.