मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यांमध्ये त्यांचे झंजावाती दौरे सुरू आहेत. अशातच शरद पवारांबाबतच Sharad Pawar वक्तव्य आता महाविकास आघाडीमध्ये रान पेटल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांना अतृप्त आत्मा म्हणाले आणि त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदींवर आगपखड करायला सुरुवात केली आहे.
Dharashiv : काँग्रेसचा तुमच्या घरावर छापा टाकून अर्धी संपत्ती लुटण्याचा इरादा आहे ! धाराशिवमध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” मृत्यू नंतर आत्म्याच्या गोष्टी बोलल्या जातात म्हणजे त्यांना शरद पवारांचा मृत्यू हवा आहे. शरद पवार जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही अशी काहीशी भावना यांची निर्माण झालेली दिसते. यांची शेवटची सभा कधी होणार माहिती नाही असं वक्तव्य देखील अजित पवार करतात. ही काय प्रचाराची पातळी झाली का ? एखाद्या वयोवृद्ध माणसानं शंभर वर्ष जगावं असं आपण बोलतो हे त्यांच्या मृत्यूची वाट बघायला लागली आहेत. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. ” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.