मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या हालचाली आणि बदल झाले. दरम्यान मनसे MNS हा काही दिवसांपर्यंत असा पक्ष होता जो कोणासोबतही सत्तेत बसण्यासाठी सामील होत नव्हता. दरम्यान 19 मार्च रोजी राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. आणि त्यानंतर या वाक्याला छेद मिळाला.
दिल्लीमध्ये जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी लोकसभेसाठी दोन जागांची मागणी करण्यात आली होती. दिल्लीतील ही बैठक खरंतर यशस्वी झाली होती. पण त्यानंतर अनेक दिवस केवळ बैठका आणि चर्चा सुरू होत्या, परंतु राज ठाकरे यांनी महायुतीत सामील होण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू होती. आता मनसे नेमकं महायुतीमध्ये सामील का झालं नाही याचा स्पष्टीकरण समोर आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरे यांच्या समवेत बैठक पार पडली होती. याच बैठकीमध्ये खरी गोम आहे. झालं असं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसेने धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढावी यासाठी आग्रही होते आणि मनसे आणि स्वतः राज ठाकरे देखील याबाबत विरोधात होते आणि हेच नेमकं कारण झालं की मनसे महायुतीत सामील झाली नाही.