छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आमदाराला नागरिकांना मदतीचा हात देणं महागात पडल आहे. छत्रपती संभाजीनगरचे आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मदत व्हावी म्हणून आरोग्य कीट आणि स्पोर्ट्स किट त्यासह कामगार किड्सचे वाटप करण्याचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाल आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी चांगल्या भावनेतून छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांना आरोग्य, स्पोर्ट्स आणि कामगार किट्स्चे वाटप करण्याचं आयोजन केलं होतं. दरम्यान या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सामंजस्य न दाखवता अक्षरशः जाळ्या तोडून हे किट पळवले आहेत. त्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी किट घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
सर्वांना योग्य पद्धतीने समान वाटप व्हावं यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन देखील करण्यात आले होते. पण नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतील आणि असा गोंधळ होईल अशी अपेक्षाच केली गेली नव्हती. दरम्यान नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या जाळ्या देखील तोडल्या आणि या पेट्या पळवल्या आहेत.