मुंबई : महाराष्ट्रात आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची लक्षणे आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वादांवर सातत्याने पेट्रोल शिंपडले जात आहे. त्यात आता दक्षिण मुंबईतील एका जाहिरातीने मराठी विरुद्ध गुजराती वादावर पेट्रोल शिंपडले आहे.
नेमकं काय घडलं ?
दक्षिण मुंबईतील एका कंपनीने नोकरी संदर्भात जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जानवी सरना या नावाने ही पोस्ट करण्यात आली आहे. या नोकरी संदर्भातील पोस्टमध्ये धडधडीतपणे महाराष्ट्रातच मराठी माणसांना या नोकरीसाठी अप्लाय करू नये असं स्पष्ट लिहिल आहे. अर्थात मराठी माणसांचे या कंपनीमध्ये स्वागत नाही ! असं लिहिलं गेलं असल्याने रोहित पवारांनी यावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
Ahmednagar : ” आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो..” अमोल कोल्हेंची अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुजय विखेंवर नेमक्या शब्दात कडवी टीका
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले की, ” सध्या गुजराती नेत्यांचा आत्मविश्वास आणि अहंकार वाढला आहे. वरून एक आदेश आला की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात. त्यामुळे गुजराती नेत्यांचा अहंकार वाढला आहे. त्यामधूनच गुजराती कंपन्यांकडून मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. हे असे होत असेल तर मराठी लोकांची ताकद दाखवून द्यावी लागेल. ” असं रोहित पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.