छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक विचित्र घटना घडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रवक्ते संजय शिरसाठ Sanjay Shirsath हे उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान संजय शिरसाठ यांची जीभ घसरली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, जो राम का नही वो किसी काम का नही बाकी गेलं…! त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर आता मोठ्या प्रमाणावर टीका होते आहे.
दरम्यान संजय शिरसाट हे त्यांच्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण देखील देत आहेत. ते म्हणाले की, ” हे संसदीय शब्द आहेत. ते असंसदीय शब्द नाहीत. च्यायला सुद्धा संसदीय शब्द आहे. आम्ही कुणाचा अपमान केला नाही, संजय राऊतांचे शब्द संसदीय आहेत. मग त्यातील हा शब्द आहे’, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.