नागपूर : नागपुरात Nagpur आज हिवाळी अधिवेशनाचा Winter Session शेवटचा दिवस होता. आज विधानसभेत दिवस वादळी आरोपांनी गाजवला. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून आरोप प्रत्यारोप केले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील खदखद बोलून दाखवली आहे. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर एकनाथ शिंदे यांनी टीका करताना म्हटले आहे की, “आरोग्यव्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणार देशात एक नंबरचा सीएम आहे असे दाखवू नये, घरात बसून एक नंबर कसे होतात ? तो नंबर पुढून नाही तर शेवटून होता….!” अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे
आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा पाढा वाचून दाखवला आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ” रोमिन छेडा हा त्याचा प्यादा आहे. सुरुवात मुंबईतील वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षापासून झाली. हायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिले. पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एकही मालिक आणि सब का मालिक एक असल्याचे त्यांनी म्हटले. अनेकदा एक एक महिन्याचे काम दाखवून सातत्याने काम देण्यात आले. या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम दिले. त्याशिवाय फिल्टर पंप आणि अनेक कामे देण्यात आली.
” याच कंपनीला जुहू रुग्णालयात हाऊस कीपिंग काम देण्यात आले. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात काम देण्यात आले. हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसीशी संबंधित काम देण्यात आले. ही कंपनी काय काय करते याची जंत्री फार मोठी आहे. माझे डोके गरगरायला लागले असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार. पण, आता हे सगळे पुराव्यानिशी सगळं बाहेर येणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. जिथे टेंडर तिथे सरेंडर असा प्रवास सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.”
सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी असेही त्यांनी म्हटले. सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे बोगस रुग्ण व औषध दाखवण्यात आली. महापालिका तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे. या सगळ्याबाबतची माहिती घेतली आहे. या लुटलेल्या दौलतीमधून कुणी घरे भरली असा सवाल करताना आरोप करताना विचार करा, नाहीतर याहून अधिक पोतडीत असल्याचा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.