पुणे : काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या कंत्राटी भरतीचा भांडाफोड केल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गुडलक चौक येथे करण्यात आले.
‘महाविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरती पध्द्त अवलंबण्यात आली महायुतीचे सरकार आल्यानंतर ही कंत्राटी पद्धत कशी चुकीची आहे हे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे ही पद्धत कोणी आणली हे महाविकास आघाडीला विचारले पाहिजे कंत्राटी भरतीची परंपरा हे काँग्रेस च्या काळात सुरू झाली ती शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारच्या काळा पर्यंत कायम होती हीच कंत्राटी पद्धत महायुतीचे सरकार आल्यानंतर मोडीत काढण्यात आली त्याचाच तिळपापड होऊन आज महाविकास आघाडीचे नेते आज बेभान होऊन प्रतिक्रिया देत आहेत ह्या सर्व गोष्टींची माफी महाविकास आघाडी ने मागितली पाहिजे असा घणाघात धीरज घाटे यांनी केला.
यावेळी घाटे यांच्या सह महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे,पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी , राघवेंद्र मानकर , राहुल भंडारे,वर्षा तापकिर ,महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे , युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर विजय हरगुडे यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते